रेल्वेच्या UTS अ‍ॅपवरून तिकीट-पास काढताय? नियमांमध्ये झालाय मोठा बदल, जाणून घ्या…

186

मुंबईत सोयीस्कर लोकल प्रवासासाठी UTS अ‍ॅपचा वापर केला जातो. यामुळे आता युजर्सला UTS अ‍ॅप मराठीत वापरता येणार आहे. तसेच या अ‍ॅपद्वारे प्रथम आणि एसी लोकलच्या प्रवाशांना एकावेली अनेक तिकीट घेण्याची मुभादेखील सुरू करण्यात आलेली आहे.

( हेही वाचा : Investment Tips : पोस्टाच्या ‘या’ ४ योजना करतील तुम्हाला मालामाल; सुरक्षेचीही पूर्ण हमी, जाणून घ्या…)

UTS अ‍ॅपमध्ये झालेले महत्त्वपूर्ण बदल

UTS अ‍ॅप मराठीतून उपलब्ध करण्यात आले आहे. याआधी हे अ‍ॅप फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत होते.

चालू तारखेपासून प्रवाशांना पास काढता येणार आहे. या अ‍ॅपमधून मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक रास काढल्यावर तो दुसऱ्या दिवसापासून लागू होत होता परंतु आता चालू दिनांकपासून पास काढणे शक्य होणार आहे.

आधी द्वितीय श्रेणी वगळता एसी, प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकावेळी एकच तिकीट मिळत होते या नियमांमध्ये आता बदल करण्यात आला असून दुसरे तिकीट घेण्यासाठी आता १० मिनिटे थांबण्याची गरज नाही. प्रवाशांना एकाचवेळी चार तिकीटे खरेदी करता येणार आहे.

दरम्यान, रेल्वेने खालीलप्रमाणे युटीएस मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुकिंगसाठीचे अंतर सुद्धा कमी केले आहे. उपनगरीय तिकिटांसाठी विद्यमान अंतर २ किमीवरुन ५ किमी अंतर करण्यात आले आहे.

2022-23 दरम्यानच्या कालावधीत प्रवाशांकडून UTS ॲपचा वापर हळूहळू वाढला आहे. या ॲपद्वारे काढण्यात आलेल्या तिकिटांची दैनंदिन सरासरी 36 हजारवरून सप्टेंबर 2022 मध्ये (27 सप्टेंबर 2022 पर्यंत) 74 हजार एवढी झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.