मध्य रेल्वे मार्गावर १५ डबा लोकलच्या वाढीव फेऱ्या केव्हा सुरू होणार? जाणून घ्या…

163

पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डबा लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली असून या गाड्यांचे वेळापत्रक गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेवर सुद्धा ३ ते ४ वर्षांपूर्वी १५ डबा लोकल प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता मध्य रेल्वेच्या १५ डबा लोकलच्या फेऱ्यांमध्ये कशी वाढ करता येईल यासंदर्भात विचार सुरू असल्याती माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.

( हेही वाचा : कोकण रेल्वेचे विद्युतीकरण तर झाले; पण समस्या काही संपेना…)

१५ डबा लोकलच्या वाढीव फेऱ्यांची प्रतीक्षा…

मध्य रेल्वेवर २०१३ मध्ये सीएसएमटी ते कल्याण अशी १५ डबा लोकल सुरू करण्यात आली. १२ डबा लोकलपेक्षा तुलनेने १५ डबा लोकलमध्ये जास्त प्रवासी प्रवास करू शकतात. १५ डबा लोकलसाठी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, भायखळा, दादर कुर्ला, घाटकोपर, मुलुंड या स्थनाकांची लांबी सुद्धा वाढवण्यात आली. सध्या दोन १५ डबा लोकल धावत असून दैनंदिन १५ डबा लोकलच्या २२ फेऱ्या होत आहेत.

यानंतर १५ डबा लोकल सेवेचा कर्जत, कसारापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. बदलापूर, अंबरनाथ फलाटांची लांबी वाढविणे, कल्याण यार्डाचे नुतनीकरण, कल्याण-कसारा तिसरी-चौथी मार्गिका यानंतरच १५ डबा लोकलच्या वाढीव फेऱ्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.