महाराष्ट्रात शिवसेनेत यशस्वी बंड केल्यानंतर सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर व्हावा यासाठी मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आसाम येथील कामाख्या देवीला केला होता. सत्ता स्थापन होऊन ३ महिने उलटल्यावर शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि खासदार शुक्रवारी आसामला गेले. शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि शिंदे गटाच्या आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेत नवस फेडला, मात्र त्याच मंदिरात उभे राहून शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी चक्क नवस अजून बाकी आहे, असे वक्तव्य करून सर्वांचे लक्ष केंद्रित केले आहे. मागील महिन्यात बच्चू कडू यांनी प्रचण्ड नाराजी व्यक्त करत सत्तेतून १० आमदार घेऊन बाहेर पडू असा इशारा दिला होता.
काय म्हणाले बच्चू कडू?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार चांगले काम करत आहे. सत्ता स्थापना झाल्यानंतर नवस फेडला तरी अजून नवस फेडायचा बाकी आहे. मला अपंगाचे खाते दिले असले तरी ज्या हेतूसाठी हे सरकार स्थापन झाले आहे, त्या उद्देशानुसार या सरकारचा फायदा समाजातील तळागाळातील जनतेला होणे अपेक्षित आहे. त्यानुसार या सरकारने काम करावे, असे मंत्री बच्चू कडू म्हणाले. राज्यपालांनी चपला घालून हौतात्म्याने अभिवादन केल्यावरून कडू म्हणाले की, राज्यपालांना समज द्यायला हवी.
(हेही वाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कामाख्या देवीचा नवस फेडला आणि म्हणाले…)
कोण आहेत बच्चू कडू?
बच्चू कडू हे अपक्ष आमदार आहेत. त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले. मागील महिन्यात भाजपचे समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर शिंदे गटाला समर्थन देण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यावरून कडू यांनी संतापले होते. त्यानंतर रवी राणा आणि कडू यांच्यात वाद विकोपाला जात आहे. हे पाहताच या दोन्ही आमदारांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावून त्यांच्यातील वाद मिटवला आणि कडू यांना अपंगांचे खाते देऊन मंत्रिमंडळात घेण्यात आले.
Join Our WhatsApp Community