स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर हे एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीवर शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या ‘प्रेस कॉन्फरन्स’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी वाहिनीच्या संपादक मंडळाकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.
रॅपिड प्रश्नांवर अशी दिली रणजित सावरकरांनी उत्तरे!
प्रश्न : वीर सावरकर स्वतःला सुभाषचंद्र बोस यांच्या जवळ मानायचे कि भगतसिंग?
उत्तर : भगतसिंग
प्रश्न : वीर सावरकरांना तुम्ही कुणाच्या जवळ बघता, वाजपेयी कि मोदी?
उत्तर : मोदी
प्रश्न : वीर सावरकर यांचे १८५७ चे बंड हे पुस्तक तुम्हाला आवडते कि हिंदुत्व?
उत्तर : हिंदुत्व
प्रश्न : आज वीर सावरकर यांच्या जवळ कोण आहे, शिवसेना कि भाजपा?
उत्तर : नवीन एकनाथ शिंदे यांची शिवसेना. कारण ते जातपात न बघता काम करतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही जातपात न बघता काम करायचे, उद्धव ठाकरे तसे काम करत नाहीत.
रणजित सावरकर यांनी अशी मांडली भूमिका
प्रश्न : वीर सावरकर यांना वाजपेयी बहुरंगी व्यक्तिमत्व म्हणाले तुम्ही सावरकर यांना कसे पाहता?
उत्तर : सावरकर बहुरंगी व्यक्तीमत्व वाजपेयी म्हणाले, सावरकर कवी होते, पण माझ्या दृष्टीने ते तर्कशास्त्र, बुद्धिवादी होते, बुद्धिवादी, राष्ट्रवादी नेता ही त्यांची खरी ओळख मला वाटते.
प्रश्न : मोदी सरकारने सावरकर यांना अजून भारतरत्न दिला नाही, यावर काय म्हणायचे?
उत्तर : मी स्वतः वीर सावरकर यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी करत नाही, कारण जनतेने त्यांना स्वातंत्र्यवीर हा सन्मान दिला, हाच मोठा आहे. मग काँग्रेसने तरी गांधींना भारतरत्न का दिला नाही? वीर सावरकर यांना भारतरत्न सरकारला द्यायचा असेल तर द्यावा, आम्हाला काही अपेक्षा नाही.
प्रश्न : सावरकर यांच्याविषयी कर्नाटकातील पाठ्यपुस्तकातील उल्लेख चुकीचा आहे का?
उत्तर : वीर सावरकर यांनी म्हटले होते कि, मी जेव्हा कोठडीत असायचो तेव्हा माझे मन बाहेर भ्रमंती करायचे, जेव्हा मी कोलू ओढायचो, वेदना व्हायच्या तेव्हा माझे शरीर कोलू ओढायचे, पण माझे मन मी बाहेर पाठवायचो, त्याचे आकलन करण्यात चूक झाल्यामुळे कर्नाटकातील पाठ्यपुस्तकात त्याचा चुकीचा संदर्भ देण्यात आला. पुस्तकातील उल्लेख चुकीचाच आहे.
प्रश्न : कपूर कमिशनमध्ये सावरकर यांना गांधी हत्येतील आरोपी म्हटले आहे का?
उत्तर : कपूर कमिशनने वीर सावरकर हे महात्मा गांधी यांच्या हत्येतील आरोपी आहेत, असे म्हटले नाही. कपूर कमिशनच्या रिपोर्टवर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले होते कि, कपूर कमिशनने कुठेही वीर सावरकर यांना गांधी हत्येतीतील आरोपी म्हटले नाही.
(हेही वाचा हे घ्या पुरावे; राहुल गांधींच्या आरोपांना रणजित सावरकरांचे सडेतोड उत्तर)
Join Our WhatsApp Community