अभिनेते पुनित इसर यांचा ई-मेल आयडी हॅक करुन, लाखो रुपये लाटण्याचा प्रयत्न फसला;आरोपी अटकेत

158

सिनेअभिनेते पुनित इसर यांचा ई- मेल आयडी हॅक करुन त्यांचे 13 लाख 76 हजार रुपये लुटण्याचा एका तरुणाचा डाव ओशिवारा पोलिसांनी उधळून लावला. इसर यांनी त्यांच्या नाटकासाठी केलेले बुकिंग परस्पर रद्द करुन ते पैसे लाटण्याचा प्रयत्न त्याने केला होता, पण  पोलिसांनी अभिषेक सुशीलकुमार नारायण या भामट्याला बेड्या ठोकल्या.

पुनित इसर यांची शो मेन थेटर प्रोडक्शन नावाची कंपनी असून सदर कंपनीचा व्यवहार हा शोमन थिएटर जीमेल डाॅट काॅम या ई-मेलद्वारे करण्यात येतो. इसर यांनी त्यांचे हिंदी नाटक जय श्रीराम या नाटकाच्या प्रयोगासाठी एनसीपीए थेटर बुक केले होते. 22 नोव्हेंबर रोजी एनसीपीए थेटरला मेल करण्यासाठी त्यांनी त्यांचा ई- मेल लाॅगिन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ओपन झाला नाही. तेव्हा त्यांचा ई-मेल आयडी हॅक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तेसर यांनी ओशिवरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

( हेही वाचा: आसामच्या मुख्यमंत्र्यांना शहाजीबापू पाटलांच्या डायलाॅगची भुरळ; ‘काय झाडी, काय डोंगर’… )

‘असे’ वाचले ईसर यांचे पैसे

याची तत्काळ दखल घेत वरिष्ठ निरीक्षक मनोहर धनावडे, निरीक्षक सीमा सपुंड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिगंबर कुरकुटे तसेच अशोक कोंडे, विक्रम सरनोबत, सोनू पाटील या पथकाने तपास सुरु केला. पथकाने एनसीपीए थेटरचे प्रतिनिधीशी संपर्क केला असता त्यांना सदर ई-मेलने नाटकासाठी केलेला बुकिंग रद्द करुन दिलेली रक्कम बॅंक खात्यात जमा करण्याबाबत सांगितल्याचे समजले. त्यामुळे इसर यांचा ई-मेल हॅक झाला असल्याने कोणताही व्यवहार अथवा बुकिंग रद्द करु नये, असे त्या प्रतिनिधींना सांगून इसर यांचे पैसे जाण्यापासून रोखले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.