अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, 2023 सालापर्यंत मानव चंद्रावर राहू आणि काम करु शकेल. अतंराळात अनेक रहस्य आहेत. ही उलगडण्यासाठी अनेक अवकाश संशोधन संस्था प्रयत्न करत आहेत. तसेच, पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांवर मानवाला राहता येईल का याबाबतही संशोधन सुरु आहे. त्यातच आता नासाच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, 2023 पर्यंत मानव चंद्राच्या पृष्ठभागावर राहू शकेल.
आर्टेमिस-1 मोहिमेंअतर्गत चंद्राच्या दिशेने सोडण्यात आलेल्या ओरियन स्पेसक्राफ्ट कार्यक्रमाचे प्रमुख हाॅवर्ड हू यांनी सांगितले की, आम्ही पुढील आठ वर्षांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर माणसांना पाठवणार आहोत. हे लोक तिथे जाऊन वैज्ञानिक प्रयोग करतील.
( हेही वाचा: आसामच्या मुख्यमंत्र्यांना शहाजीबापू पाटलांच्या डायलाॅगची भुरळ; ‘काय झाडी, काय डोंगर’… )
We Could Be Living And Working on The Moon by 2030, Says NASA https://t.co/4LB7kvoBBO
— ScienceAlert (@ScienceAlert) November 22, 2022
2030 पर्यंत मानव चंद्रावर राहू शकेल
नासाने अलीकडेच आपल्या शक्तिशाली स्पेस लाॅन्च सिस्टम राॅकेटद्वारे ओरियन अतंराळयान चंद्राच्या दिशेने पाठवले आहे. ओरियन अंतराळयान सध्या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण अनेकवेळा पुढे ढकलले गेले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात ते लाॅंच करण्यात आले. सुमारे 50 वर्षांनंतर नासा चंद्राच्या दिशने मानवी मोहिम सुरु करत आहे. सध्या जे ओरियन अंतराळयान चंद्राभोवती फिरत आहे, त्यामध्ये मानव नाही. पण त्याच अंतराळयानातून भविष्यात मानवाला चंद्रावर पाठवले जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community