मूल दत्तक घेताय? तर त्यांना सर्व लसी दिल्या आहेत की नाही तपासा

154

दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीत १९ वर्षीय मुलीला गोवरची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. एका दाम्पत्याने या मुलीला दत्तक घेतले होते. तीन महिन्यांच्या मुलीला जन्मापासून कोणती लस दिली आहे की नाही, तसेच दाम्पत्यांच्या स्वतःचा लसीकरणावर विश्वास नसल्याने वयाच्या १९व्या वर्षी या मुलीला गोवरची लागण झाली.

मुंबईत गोवरची साथ आढळून आल्याचे पालिकेने नोव्हेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात जाहीर केले. गोवंडी हे मुंबईतील गोवरचा हॉटस्पॉट ठरले आहे. निरक्षर आणि मजूरांची वसाहत असलेल्या गोवंडीत अज्ञानाचे प्रमाण भरपूर आहे. अनियंत्रित लोकसंख्या वाढ आणि आरोग्याच्या मूलभूत समस्येने ग्रासलेल्या गोवंडीत गोवरचे रुग्ण कमी करण्याचे आव्हान  आहे. तर दुसरीकडे कुलाबा येथील रेडिओ क्लब येथील सिंधी कुटुंबीयांत १९ वर्षीय मुलीचा बुधवारी तपासणी अहवाल पालिका अधिका-यांना मिळाला. या अहवालात मुलीला गोवरची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मुलीला दत्तक घेतल्यानंतरही गोवर तसेच इतर आवश्यक लसही त्यांनी दिली नव्हती. लसीकरणावर विश्वास नसल्याने सिंधी समाजही लसीकरणापासून फारकत घेत असल्याचे या प्रकरणावरुन उघडकीस आले. मात्र तपासणी अहवालानंतर मुलीला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीच्या तब्येतीत सुधारणा होत असून, तिला लवकरच डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

( हेही वाचा: मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा; ‘कंटेनरभरुन खोके कोणाकडे जात होते, ते लवकरच’… )

ही मुलगी ए विभागात सापडलेल्या पहिल्या चार गोवरबाधित रुग्णांपैकी चौथी रुग्ण आहे. पहिले तीन रुग्ण लहान वयोगटातील असून, तिघेही कुलाब्यातील आंबेडकर नगर या बंजारा वसाहतीतील आहे. या वसाहतीतही लसीकरण मोहिम राबवयाला पालिका अधिका-यांना अडचणी येत आहेत. एकीकडे बंजारा समाजातील नेत्यांची आंबेडकर वसाहत लसीकरणापासून दूर असल्याची ओरड असताना वसाहतीतील स्त्रिया लसीकरण मोहिमेसाठी भेटी देणा-या पालिका अधिका-यांना नाकारत असल्याचेही दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.