Mutual Fund मध्ये केलेल्या गुंतवणुकीचे पैसे काढायचे असल्यास आता ते तीन दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करावेत, असे निर्देश भांडवली बाजार नियंत्रक असलेल्या सेबीने जारी केले आहेत.
आतापर्यंत आपल्या खात्यातील पैसे काढल्यानंतर ते खात्यात जमा होण्यासाठी गुंतवणूकदारांना 10 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. तो कालावधी आता सात दिवसांनी कमी करत तीन दिवसांवर आणण्यात आला आहे. तसेच, म्युच्युअल फंडातील योजनेअंतर्गत जो बोनस दिला जातो, तोदेखील गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये अथवा पुनर्गुंतवणुकीमध्ये करण्याची कार्यवाही सात दिवसांत करावी, असेही सेबीने स्पष्ट केले आहे. यापूर्वी बोनस जमा होण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागत होता.
( हेही वाचा: धक्कादायक! मुंबईतील बारमध्ये चिकनऐवजी दिले जातेय ‘कबुतर स्टार्टर’? )
Join Our WhatsApp Community