मध्य प्रदेशात एकीकडे लहान मुलं गेम्सकडे वळले आहेत तर दुसरीकडे आरोग्य विभागाने धुम्रपान आणि तंबाखू उत्पादनाचे सेवन करण्याबाबत धक्कादायक आकडेवारी जारी केली आहे. ग्लोबल यूथ टोबॅको सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, मध्य प्रदेशातील मुली बिडी-सिगरेटच्या नशेत आघाडीवर आहेत. या राज्यात मुली सरासरी वयाच्या सातव्या वर्षी सिगारेट ओढण्याच्या व्यसनाच्या आहारी जातात. मुलं सरासरी वयाच्या 11.5 व्या वर्षी सिगारेट ओढतात. तर वयाच्या सातव्या वर्षी सिगरेट ओढणाऱ्या मुलींचा आकडा 9.3 टक्क्यांच्या पार पोहोचला आहे. यासह बिडी पिणाऱ्या मुली 13 टक्के आहेत.
(हेही वाचा – एलॉन मस्क तयार करणार स्मार्टफोन! Apple आणि Google ला दिला थेट इशारा, म्हणाले…)
मध्यप्रदेशात शिवराज सरकार नशा मुक्ती अभियान राबवत आहेत. तर आरोग्य विभागाकडून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामुळे फक्त आरोग्य विभागाचे नाही तर सरकारचे टेन्शनही वाढवले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक प्रियंका दास यांनी उमंग स्कूल हेल्थ अॅण्ड वेलनेस कार्यक्रमातील सादरीकरणात हे आकडे जाहीर केले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या पहिल्याच सर्वेक्षणात ही आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.
नॅशनल हेल्थ मिशनच्या संचालक प्रियंका दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील 100 पैकी 7 मुली सिगारेट ओढतात. तर 11.1 टक्के मुली बिडी ओढतात. दारू आणि ड्रग्जचे सेवन करणाऱ्या मुलींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सर्वेक्षणातून अशी बाब समोर आली की, सरासरी वयाच्या 7 व्या वर्षी मध्य प्रदेशातील मुली धुम्रपान करण्याच्या आहारी जातात. धक्कादायक म्हणजे मध्य प्रदेशात 25 टक्के तरुण नशेच्या आधीच आहारी गेले असून अभ्यास किंवा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात हॉस्टेल किंवा खासगी रूम घेऊन राहणाऱ्या मुलींमध्ये सर्वाधिक नशा करत असल्याचे समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community