योगगुरू रामदेव बाबा यांनी अलिकडेच महिलांच्या पेहरावावरुन केलेल्या एका विधानामुळे चांगलाच वाद उफाळून आला. मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासमोर रामदेव बाबांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे मोठा गदारोळ उठला. पण आता याबाबत अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांचा हेतू चांगला होता, पण…
रामदेव बाबांचा महिलांच्या स्वातंत्र्याबाबत बोलण्याचा होतू होता. पण त्यांना त्यांचे मत योग्यपणे मांडता आले नाही. त्यांना आपली भूमिका वेगळ्या पद्धतीने आणि अधिक सभ्यपणे मांडता आली असती, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
(हेही वाचाः Gujarat Assembly Election: काँग्रेसमध्ये प्रवेश करत बड्या नेत्याचा भाजपला धक्का, निवडणुकीच्या तोंडावर बंडाळी वाढली)
रामदेव बाबांचा माफीनामा
महिला सलवार आणि कुर्त्यामध्ये छान दिसतात, काही घातलं नाही तरीही महिला छान दिसतात, असे वादग्रस्त विधान रामदेव बाबा यांनी केले होते. त्यानंतर राज्य महिला आयोगाकडून रामदेव बाबा यांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीला उत्तर देताना रामदेव बाबा यांनी माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. तरीही माझ्या वक्तव्याने कोणत्याही महिलेचे मन दुखावले असल्यास मी माफी मागतो, असे बाबा रामदेव यांनी आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community