गोरेगाव, वांद्रे- सांताक्रूझ परिसरातील कोणत्या भागात असेल मंगळवार, बुधवारी पाणीकपात

139
मुंबई महापालिकेच्या पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर जोडकाम मंगळवारी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम बुधवारी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत  पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या कालावधीत म्हणजेच मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून बुधवारी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत वांद्रे ते सांताक्रूझ पूर्व ( एच/पूर्व) वांद्रे ते सांताक्रूझ( एच/पश्चिम), गोरेगाव (पी/दक्षिण) या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील

गोरेगाव बिंबीसार नगर

बिंबीसार नगर – *(सायंकाळी ६.०० ते रात्री ९.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – ( २९.११.२०२२ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा येईल).

गोरेगाव पश्चिम मंगळवारी नसेल पाणी

राम मंदीर, गोरेगाव पश्चिम – (सायंकाळी ७.३० ते रात्री ९.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (२९.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील).

खार- सांताक्रूझ पूर्व भागातील या परिसरात नसेल बुधवारी  पाणी

 टीपीएस III, टीपीएसV, आगरीपाडा, सेवा नगर, हनुमान टेकडी, ७ वा रस्ता, खार सबवे, डवरी नगर, शिवाजी नगर, गावदेवी, वाकोला पाईप लाईन मार्ग, नेहरु मार्ग – (पहाटे ४.०० ते सकाळी ७.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – ( ३०.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील).

खार- सांताक्रूझ पश्चिम भागातील या परिसरात नसेल पाणी

सांताक्रुझ (पश्चिम), गजधरबंध, खार पश्चिमचा पश्चिम रेल्वे परिसर व डॉ. आंबेडकर मार्ग मधील काही परिसर – (पहाटे ४.३० ते सकाळी ९.०० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – ( २९.११.२०२२ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ८.३० व दिनांक ३०.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील).

वांद्रे पश्चिम कमी दाबाने होईल पाणी पुरवठा

वांद्रे (पश्चिम) – (पहाटे ४.३० ते सकाळी ९.०० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – ( २९.११.२०२२ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ८.३० व दिनांक ३०.११.२०२२ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने राहील).
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.