राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाषणात शिवरायांचा उल्लेख केला, त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला आहे, त्यामुळे राज्यभर राज्यपालांच्या विरोधात नाराजी व्यक्त होत आहे, अशा स्थितीत राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यपाल पदापासून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित होत होते, मात्र आता राजभवनाने याचे खंडन करण्यात आहे की, हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले.
राज्यपालांविषयी नाराजी
मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रातील जनतेला दुखावणारी वक्तव्ये करत आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपाल विरोधकांसह राज्यातील जनतेच्या निशाण्यावर आले आहेत. विविध स्तरातून राज्यपालांना तीव्र विरोध होत आहे, तसेच काहीजण त्यांना पदमुक्त करा, अशी मागणी करत आहेत. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याचे वृत्त पूर्णत: निराधार आणि चुकीचे आहे. या बातमीचे खंडन राजभवनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पदमुक्त होण्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे.
(हेही वाचा सनातन धर्म सर्वश्रेष्ठ आहे, भाजपच्या नेत्या रुबी आसिफ खान यांचे वक्तव्य)
Join Our WhatsApp Community