पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये चढ-उतार होत असले तरी त्या किंमती या सर्वसामांन्यांच्या खिशाला परवडणा-या नाहीत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी कायमंच सर्वसामांन्यांना झळा पोहोचत असतात. पण यामुळेच हैराण झालेल्या सर्वसामांन्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. सर्वसामांन्यांना 68 लिटर पेट्रोल-डिझेल मोफत मिळण्याची संधी उपलब्ध झाली असून, त्याचे सोने करणे हे केवळ सर्वसामांन्यांच्या हातात आहे.
पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवेळी इंडियन ऑईल सिटी क्रेडिट कार्डने पेमेंट करणे हे आपल्याला नक्कीच फायद्याचे ठरू शकते. या कार्डच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास 68 लिटर पेट्रोल आणि डिझेल मोफत मिळणे शक्य आहे. Indian Oil Citi Credit Card हे एक इंधन क्रेडिट कार्ड असून, या कार्डाचा वापर करुन खरेदी केल्यावर मिळणारे रिवॉर्ड(टर्बो) पॉइंट्स रिडीम करुन हा लाभ घेता येऊ शकतो.
(हेही वाचाः EPFO: पीएफ धारकांसाठी आनंदाची बातमी, पेन्शनच्या नियमांमध्ये ‘हा’ बदल झाल्यास होणार मोठा फायदा)
कार्डाचा असा होऊ शकतो फायदा
- इंडियन ऑईल पंपांवर टर्बो पॉइंट्स रिडीम करुन 68 लिटर पर्यंत इंधन मोफत मिळू शकते
- तसेच इंडियन ऑईल पंपांवर इंधनावर लागणारा 1 टक्के अधिभार माफ होणार
- इंडियन ऑईल पंपांवर प्रति 150 रुपयांच्या इंधन खरेदीवर मिळवा 4 टर्बो पॉइंट्स
- या कार्डद्वारे मॉल किंवा सुपर मार्केटमध्ये प्रति 150 रुपयांची शॉपिंग केल्यास मिळणार 2 टर्बो पॉइंट्स
- तसेच इतर ठिकाणी कार्डद्वारे खरेदी केल्यास मिळणार 1 टर्बो पॉइंट
- इंडियन ऑईल पंपांवर टर्बो पॉइंट्स रिडीम केल्यास मोठा फायदा होऊ शकतो
- पंपावरील रिडीमशन रेट 1 टर्बो पॉइंट म्हणजे 1 रुपया इतका आहे
- तसेच, MakeMyTrip,EaseMyTrip,IndiGo,goibibo,Yatra.com वर रिडीमशन रेट- 1 टर्बो पॉइंट= 25 पैसे
- BookMyShow,Airtel,Jio,Vodafone च्या पेमेंटसाठी हे कार्ड वापरल्यास 1 टर्बो पॉइंटला आपल्याला 30 पैसे मिळू शकतात
- यामुळे रिडीम होणारे पैसे हे खात्यात जमा होतील