नवी मुंबई येथील मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळ भीषण आग लागल्याची घटना सोमवारी घडली आहे. या आगीत रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या पार्किंगमधील तब्बल 42 दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे या आगीत गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
42 दुचाकी जळून खाक
मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर असणा-या दुचाकींच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांना संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही आग लागली आहे. काही समाजकंटकांकडून ही आग लावण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, आगीत 42 दुचाकींचे मोठे नुकसान झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
(हेही वाचाः सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? ‘ही’ सोपी ट्रिक वापरा आणि ओळखा)
आग लावण्यात आल्याचा अंदाज
मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर रहिवाशांकडून दुचाकी पार्क करण्यात येतात. त्याच गाड्यांनी अचानक सोमवारी पेट घेतला. ही आग मुद्दाम लावण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण तोपर्यंत भीषण आगीमध्ये 42 दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community