खोटे बोलण्याची स्पर्धा असती, तर उद्धव ठाकरेंचा पहिला नंबर आला असता – शेलार

146

देशात खोटे बोलण्याची स्पर्धा असती, तर उद्धव ठाकरेंचा पहिला नंबर आला असता, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली. सहकार आणि शिक्षक आघाडीच्यावतीने दहिसर पूर्वमध्ये आयोजित केलेल्या जागर मुंबईचा अभियानात ते बोलत होते.

( हेही वाचा : सक्तीच्या धर्मांतरविरोधी कायद्यासाठी केंद्राने घेतली मोठी भूमिका, सर्वोच्च न्यायालयात काय सांगितले?)

मी मुख्यमंत्री असतो, तर महिलांची बदनामी करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून लाथ मारून बाहेर काढले असते, असे उद्धव ठाकरे काल म्हणाले. मी विचार केला खोटे बोलण्याची स्पर्धा लावली, तर प्रथम क्रमाकांचे बक्षिस उद्धव ठाकरेंना मिळेल. इतके धादांत खोटे ते बोलतात. महिलांचा अपमान कुणीच करू नये, आम्ही त्याचा निषेध करतो. पण त्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री दाऊदच्या बहिणीबरोबर व्यवहार करतो. काळ्या पैशाने तिची प्रॉपर्टी विकत घेतो, तोच काळा पैसा बॉम्बस्फोटात वापरलो जातो, असे एएनआय म्हणते. त्या मंत्र्याला काढावेसे उद्धवजींना वाटले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सर्जिल उस्मानी सारखा सडक्या मेंदूचा माणूस महाराष्ट्रात येऊन हिंदू धर्माचा अवमान करतो. त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही मागणी करतो. पण लांगूलचालन करणारा मुख्यमंत्री असल्यामुळे सर्जिल उस्मानीवर गुन्हा दाखल केला नाही. हिंदूमध्ये फूट पाडण्याचे जे काम मोहम्मद गझनीला जमले नाही, ते काम उद्धव ठाकरे करत आहेत. २२ ऑक्टोबरला सामनामध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत, असे लिहिले गेले. मुस्लीम-मराठी अशी मांडणी केली जात असताना, मराठी-गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? असा सवाल शेलार यांनी केला.

आम्ही ‘सबका साथ सबका विकास’

मुस्लिम मतांचे राजकारण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून आफताब – श्रद्धा वालकरच्या प्रकरणात साधा निषेधही व्यक्त करण्यात आलेला नाही. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम उद्धवसेनेकडून सुरू आहे. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. हिंदुत फूट पाडण्याचे काम सुरू आहे ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.