संरक्षण मंत्रालयाचे आत्मनिर्भर पाऊल, 101 सामुग्रींवर आयातबंदी

352

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आत्मनिर्भर भारतासाठी मोठी घोषणा केली  असून,  संरक्षण मंत्रालयाने भारतात येणाऱ्या 101 वस्तूंवर आयातबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटरवर याबाबत घोषणा केली. संरक्षण मंत्रालयाने या घोषणेबाबत आधीच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती दिली होती. त्यामुळे राजनाथ सिंह यांच्या या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

राजनाथ सिंह काय म्हणाले ट्विटमध्ये

संरक्षण विभाग आत्मनिर्भर भारताला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेत आहे. यानुसार संरक्षण विभाग यापुढील काळात 101 वस्तूंच्या आयातीवर बंदी घालत आहे. या वस्तूंची भारतातच निर्मिती केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ नावाने स्वावलंबी भारतासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, यंत्रणा, लोकसंख्याशास्त्र आणि मागणी या 5 खांबांवर आधारित ही योजना आहे. त्यासाठी संरक्षण विभाग यापुढील काळात 101 वस्तूंच्या आयातीवर बंदी घालत आहे. या वस्तूंची भारतातच निर्मिती केली जाईल. यामुळे आत्मनिर्भर भारतासाठी नक्कीच मदत होईल असे राजनाथ सिंह म्हणाले. या निर्णयामुळे भारतीय संरक्षण उद्योगाला त्यांच्या स्वत:च्या डिझाइन आणि विकास क्षमतांचा वापर करून किंवा सशस्त्र सैन्याच्या गरजा भागवण्यासाठी डीआरडीओने तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून ‘निगेटिव्ह यादी’तील वस्तू तयार करण्याची मोठी संधी मिळेल असे देखील राजनाथ सिंह म्हणालेत. सशस्त्र दल, सार्वजनिक आणि खाजगी उद्योग यासह सर्व भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने ही यादी तयार केली आहे. भारतातील विविध दारूगोळे आणि उपकरणे तयार करण्यासाठी भारतीय उद्योगाच्या सद्य आणि भविष्यातील क्षमतांचे मूल्यांकन करण्यात येत असल्याचे देखील राजनाथ सिंह म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.