सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान बेस्टच्या दुमजली इलेक्ट्रिक एसी बस मुंबईकरांच्या सेवेत समाविष्ट होती असे सांगण्यात आले होते परंतु आता नोव्हेंबर महिना उजाडला तरीही मुंबईकरांना दुमजली बसची प्रतीक्षा आहे. प्रवाशांच्या सेवेत येण्यापूर्वी बस चाचण्यांमध्ये अडकली आहे. सध्या उपक्रमाकडे ४५ विनावातानुकूलित दुमजली बस आहेत. एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात तर दुमजली बसची प्रवासी आसन क्षमता ७८ आहे. प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक असल्याने उपक्रमाने दुमजली बसेस सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. दुमजली बसप्रमाणे प्रिमियम बसेस सुद्धा प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला होता मात्र या बस सुद्धा अद्याप सुरु झालेल्या नाहीत. या प्रिमियम बसेसमध्ये प्रवाशांना आधीच त्यांचे आसन बुक करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ बस थांब्यांजवळ प्रवाशांना ‘इलेक्ट्रिक बाईक’ सेवा, फक्त २० रुपयात फिरा, कुठे कराल नोंदणी? )
नव्या बसची वैशिष्ट्य
- प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता.
- नव्या बसमध्ये Digital तिकीटांची सोय असेल
- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
- नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.
- बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील.
- दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.
- प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक