राज्यात पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरूण-तरूणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. पोलीस भरतीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.
(हेही वाचा – मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर! शिवनेरी, अश्वमेधसाठी MSRTC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय)
पोलीस भरतीसंदर्भात ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील अनेक उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे राज्य सरकारने अर्ज भरण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये असे म्हटले की, राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या भरतीसाठी आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले आहे.
राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ.
आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त.
अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 29, 2022
काय म्हणाले फडणवीस
पोलीस भरतीसाठी अर्ज भरताना नॉन क्रिमिलीअरच्या संदर्भात काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. गेल्या वर्षाचे नॉन क्रिमिलीअर सर्टीफिकेट या वर्षी मिळते. त्यामुळे मागील वर्षीचे हे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. पोलीस भरतीसंदर्भातील ज्या काही मागण्या आहेत, त्या आम्ही मान्य केल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community