पोयसर जिमखान्याच्या पोयसर तिरंदाजी स्पर्धा 2022 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या तिरंदाजांना मोठे यश आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आर्चरी क्लबचे तब्बल 34 तिरंदाज या स्पर्धेत सहभागी झाले होते. या सर्व तिरंदाजांनी 80 टक्क्यांपेक्षा जास्त पदकं मिळवली असून त्यामध्ये सुवर्ण पदकांची संख्या ही सर्वाधिक आहे.
या तिरंदाजी स्पर्धेतील स्वातंत्र्यवीर सावरकर आर्चरी क्लबचे विजेते
वंश विनायक पांचाळ- ओव्हरऑल (गोल्ड)
छाया आनंद जिमान- ओव्हरऑल (गोल्ड)
श्वेता गोडसे- ओव्हरऑल (सिल्व्हर)
आदिती म्हात्रे- ओव्हरऑल (गोल्ड)
हार्दिक आहेरकर- ओव्हरऑल (सिल्व्हर)
10 वर्षांखालील विजेते
अद्वय सावंत- 10 मी.(गोल्ड), ओव्हरऑल (गोल्ड)
स्मित वराडकर- गोल्ड
शरीन पाटील- 80 सेमी.(सिल्व्हर), 122 सेमी. फेस(सिल्व्हर),ओव्हरऑल (सिल्व्हर)
अस्मीत कौर संधू- 80 सेमी. फेस(गोल्ड),122 सेमी. फेस(गोल्ड),ओव्हरऑल (गोल्ड)
12 वर्षांखालील विजेती
सोनम शेलार- 15मी.(गोल्ड),20 मी.(गोल्ड),ओव्हरऑल (गोल्ड)
14 वर्षांखालील विजेते
संकल्प जाधव- 30 मी.-गोल्ड,ओव्हरऑल (गोल्ड)
नचिकेत देशमुख- 20मी.(सिल्व्हर)
श्रेयसी वैद्य- 30मी.(गोल्ड),ओव्हरऑल (गोल्ड)
17 वर्षांखालील विजेते
दर्श जारे- 40 मी.(गोल्ड),30मी.(गोल्ड),ओव्हरऑल (गोल्ड)
शर्मिका घाडीगांवकर- 40 मी.(गोल्ड),30मी.(गोल्ड),ओव्हरऑल (गोल्ड)
खुल्या गटातील विजेते
प्रथमेश जाधव- 50मी.(ब्राँझ),30मी.(ब्राँझ),40 मी.(गोल्ड),30मी.(गोल्ड),ओव्हरऑल (सिल्व्हर)
कुणाल कल्याणकर- 50मी.(गोल्ड),30मी.(गोल्ड),40 मी.(गोल्ड),30मी.(गोल्ड),ओव्हरऑल (गोल्ड)
नेहा टिकम- 50मी.(ब्राँझ),30मी.(ब्राँझ),ओव्हरऑल (ब्राँझ)
अशी घवघवीत सुवर्णपदकांची कमाई स्वातंत्र्यवीर सावरकर आर्चरी क्लबच्या तिरंदाजांनी केली आहे. तसेच अजूनही तीन पदके ही क्लबला मिळाली असती पण काही चुकीच्या निर्णयांचा आणि स्पर्धेतील अंतर्गत राजकारणाचा फटका हा स्पर्धकांना बसला असल्याचे क्लबच्या वतीने स्वप्नील परब यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community