पुण्यातील ‘या’ भागांत दोन दिवस वीजपुरवठा होणार खंडित, वाचा संपूर्ण यादी

182

पुणे शहरातील शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात गुरुवार 1 डिसेंबर आणि रविवार 4 डिसेंबर रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील महापारेषणच्या अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन टॉवर उभारणीचे आणि अन्य दुरुस्तीची कामे दोन टप्प्यांत करण्यात येणार आहेत. त्यासाठीच हा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न

पुण्यातील गणेश खिंड येथे महापारेषणचे 132 केव्ही अतिउच्च दाबाचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला गणेशखिंड ते रहाटणी आणि गणेश खिंड ते चिंचवड या वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. पण या वीजवाहिन्यांचे मनोरे आणि तारांमुळे औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील वाहतुकीस मोठी अडचण होत आहे.

(हेही वाचाः फलंदाजांना रन आऊट करायच्या नादात विकेट कीपरनेच काढले दोन रन, बघा मजेदार व्हिडिओ)

नवे टॉवर उभारण्याचे काम

त्यामुळे महापारेषण कंपनी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने नवीन मोनोपोल टॉवर उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 1 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते दुपारी 1 पर्यंत तसेच 4 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

इतक्या ग्राहकांना बसणार फटका

या कामासाठी महावितरणच्या 11 केव्ही आणि 22 केव्ही क्षमतेच्या एकूण 32 वीजवाहिन्यांना केला जाणारा वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. यामध्ये शिवाजीनगर परिसरातील 28 तर कोथरुड परिसरातील 4 वीजवाहिन्यांचा समावेश असणार आहे. यामुळेच शिवाजीनगर परिसरातील 38 हजार 500 तसेच डेक्कन आणि जंगली महाराज रोड परिसरातील 8 हजार 500 ग्राहकांना होणारा वीजपुरवठा बंद करावा लागणार आहे.

(हेही वाचाः जर तुमच्याकडे अशी संपत्ती आहे तर सरकार करणार कारवाई, काय आहे प्लॅन)

वीजपुरवठा बंद राहणारे भाग

फर्ग्युसन रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, मोदीबाग, रेंज हिल्स, ई-स्क्वेअर, वडारवाडी, गोखलेनगर, लकाकी रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, मंगलवाडी, वेताळबाबा चौक, राजभवन, खैरेवाडी, अशोकनगर, यशवंत घाडगेनगर, पोलीस लाईन वसाहत, घोले रस्ता, शिवाजीनगर गावठाण, कॉंग्रेस भवन, सावरकर भवन, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, तोफखाना, मंगला टॉकीज, आयआयटीएम, कॅस्टेल रॉयल टॉवर, काकडे मॉल, एसएसपीएमएस कॉलेज, रेव्हेन्यू कॉलनी, आकाशवाणी, शिमला ऑफीस, सीआयडी वसाहत, संचेती हॉस्पीटल, लक्ष्मी रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ व सदाशिव पेठचा काही भाग, चित्रशाला, आपटे रस्ता, शिरोळे रस्त्याचा अर्धा भाग, जंगली महाराज रस्ता, पुलाची वाडी, छत्रपती चौक, आयएमडीआर कॉलेज, गणेशवाडी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.