ई-वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे चार्जिंग स्थानके उभारण्यास पुणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहराच्या विविध भागात १ हजार ७०० चार्जिंग पॉईंट महापालिकेने प्रस्तावित केले आहेत. महापालिकेच्या इमारती, नाट्यगृह, वाहनतळ, उद्याने अशा ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. यातून एकाच वेळेस ३०० इलेक्ट्रिक वाहने – मोटारींसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार आहे.
( हेही वाचा : 7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! घर बांधण्यासाठी मिळणार तब्बल २५ लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण योजना )
विविध ठिकाणी चार्जिंग पॉईंट सुविधा
प्रादेशिक परिवहन विभागाकडील आकडेवारीनुसार शहरात २९ हजार ई-वाहनांची नोंद आहे. त्यामध्येही चारचाकी वाहनांच्या तुलनेत दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. ई-वाहनांच्या तुलनेत शहरात मर्यादित स्वरूपात चार्जिंग पॉईंट आहेत. त्यामुळे आता ते वाढविण्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शाळा, वाहनतळ, उद्याने आणि रुग्णालये अशा महापालिकेच्या मिळकतींमध्ये चार्जिंग पॉईंट उभारण्याचे नियोजित आहे. याशिवाय महापालिकेने भाडेतत्त्वावर ई-बाईक योजनेला मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत विविध भागात २५० चार्जिंग पॉईंट उभारण्यात येणार आहेत. सध्या विद्युत विभागाने ५०० ठिकाणे दिली आहेत. प्रत्येक ठिकाणी दुचाकीसाठी दोन चार्जिंग पॉईंट आणि चारचाकी वाहनांसाठी एक पॉईंट असेल. यामधील एका पॉंईंटने वेगाने चार्जिंग होईल तर दुसरा पॉईंट कमी वेगाने चार्जिंग करणारा असेल.
Join Our WhatsApp Community