मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 100 फूट खोल दरीत कोसळला ट्रक

162

मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी पुन्हा एकदा अपघात झाला आहे. तीन ट्रक्सनी एकमेकांना धडक देऊन झालेल्या या भीषण अपघातात एक ट्रक दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नसून, दरीत कोसळलेल्या ट्रकच्या चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे.

बुधवारी पहाटे अपघात

बुधवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात हा भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे येणा-या मार्गावर हा अपघात झाला आहे. तीन ट्रक्सनी एकमेकांना दिलेल्या धडकेत एक कंटेनर ट्रक शंभर फूट खोल दरीत कोसळला. त्याचबरोबर एका ट्रकची केबिनही दरीत कोसळली. पहाटे 4च्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः आता ‘या’ कामांसाठी Birth Certificate अनिवार्य होणार, केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय)

अपघातांची सरकारने घेतली दखल

मुंबई-पुणे महामार्गांवरील अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या वाढत्या अपघातांची गंभीर दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, आता महामार्गावरील दोन्ही मार्गांवर पुढील 6 महिन्यांसाठी 24 तास सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. 1 डिसेंबरपासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.