नदाव लॅपिड म्हणजे इस्त्रायलमधील जितेंद्र आव्हाड; अतुल भातखळकरांचा टोला

176

इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचे अध्यक्ष नदाव लॅपिड यांनी केलेल्या विधानामुळे द कश्मीर फाइल्स चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला असून, वाद निर्माण झाला आहे. लॅपिड यांनी कश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रोपगंडा आणि बटबटीत आहे, अशा शब्दांत टीका केली आहे. यानंतर फक्त बाॅलिवूडच नव्हे तर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही लॅपिड यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली होती. दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावरुन टोला लगावला आहे.

आव्हाड नेमके काय म्हणाले होते?

तो इस्त्रायली असल्याने मुस्लीमविरोधी कश्मीर फाइल्स चित्रपट चालवून घेईल, अशी सरकारची अपेक्षा होती. पण प्रचारकी आणि गलिच्छ चित्रपट म्हणून मुख्य परिक्षक नदाव लॅपिड यांनी सणसणीत चपराक लगावली, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी ट्वीट करत दिली होती.

( हेही वाचा: राज ठाकरे भाजपची नव्हे तर बाळासाहेबांची भाषा बोलत आहेत )

अतुल भातखळकरांची टीका

जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला अतुल भातखळकर यांनी उत्तर दिले आहे. कश्मीर फाइल्सवर अश्लीलतेचा आरोप करणारे इफ्फीचे यावर्षीचे मुख्य ज्युरी नदाव लॅपिड हे विकृत मानसिकतेचे म्हणून त्यांच्या देशात, इस्त्रालयमध्ये ओळखले जातात. थोडक्यात म्हणजे, ते इस्त्रायलमधले जितेंद्र आव्हाड आहेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.