पाकविरुद्धच्या सामन्याआधीच इंग्लंडच्या संघातील 12 खेळाडू आजारी, काय आहे कारण

150

टी-20 विश्वचषकातील विजयानंतर इंग्लंडचा संघ चांगलाच फॉर्ममध्ये आहे. सध्या इंग्लंडचा संघ हा पाकिस्तान दौ-यावर असून, गुरुवार 1 डिसेंबर पासून पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण पहिल्या सामन्याआधीच एक चिंताजनक बातमी इंग्लंडच्या संघाकडून मिळत आहे.

संघातील 13 पैकी 12 खेळाडू हे आजारी पडल्याची माहिती मिळत आहे. मुख्य म्हणजे मागच्या वेळी सुद्धा इंग्लिश खेळाडूंना पाकिस्तान दौ-यावर जेवणातून बाधा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा खेळाडू आजारी पडल्यामुळे कसोटी सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

(हेही वाचाः ‘आठवड्यातून रविवार आले ना रे तिनदा’, 100 कंपन्यांनी कर्मचा-यांना दिली आठवड्यातून तीन दिवसांची सुट्टी)

इंग्लंडचा संघ आजारी

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुस-या पर्वाचा भाग म्हणून पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 1 डिसेंबरपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पण पहिल्या सामन्याआधीच इंग्लंडचा संघा आजारी पडल्याचे सांगण्यात येत आहे. खेळाडूंना कोणत्यातरी व्हायरसची लागण झाली आहे. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा देखील समावेश असल्याचे म्हटले जात आहे. हा कोरोनाचा व्हायरस नसल्याचे सांगण्यात येत असून, खेळाडूंना अन्नातून या व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. पण याबाबतचे कोणतेही अधिकृत वृत्त अद्याप मिळालेले नाही.

(हेही वाचाः विनोद कांबळी निवडणार टीम इंडिया? निवड समितीच्या अध्यक्षपदी कोण येणार)

दरम्यान, मागील पाकिस्तान दौ-यावर सुद्धा अशाच प्रकारे इंग्लंडचा संघ आजारी पडला होता. त्यावेळी त्यांना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे या दौ-यावर संघाने आपला कूक सोबत ठेवला आहे. पण तरीही संघातील खेळाडू आजारी पडल्याचे समजत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.