आधार नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे राज्यातील शिक्षक भरतीसाठी संच मान्यता दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे शालेय पोषण आहार योजनेसह इतर योजनांसाठी या माहितीचा आधार घेतला जाणार आहे. मात्र, एकाच आधार क्रमांकाचे दोन ते तीन विद्यार्थी असल्याने त्यांचे आधार नुतनीकरण करायचे कसे? असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पडला आहे.
अपडेट करुन वैध, तरीही मिसमॅच…
स्टुडंट पोर्टलला आधार माहिती अपडेट करताना त्यातील काही टॅब लाॅक असल्याने नाव व जन्मतारीख अपडेट होत नाही. विद्यार्थ्यांनी आधार काढलेल्या मूळ सेंटरवरुन नावांमध्ये चुका झाल्याने त्या अपडेट करुनही बदलत नाहीत, अशा तक्रारी आहेत.
आधार अपडेट करुन वैध केल्यावरही मिसमॅचच्या संख्येतून ते वगळता येत नाहीत, अशा तकारीही आहेत. मिसमॅच होऊन आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 40 लाख 1 हजार 250 आहे. 11 लाखांवर विद्यार्थ्यांच्या आधारचे प्रोसेसिंग सुरु आहे.
( हेही वाचा :RBI ने ‘या’ बँकेवर केली मोठी कारवाई; तुमचं खात तर नाही ना? )
फटका कोणाला बसणार?
आधारकार्ड अपडेट करण्यास राज्यातील अनेक जिल्ह्यांकडून कुचराई होत असल्याचे सातत्याने दिसले आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे आधार अपडेट नसल्याने ते या योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community