राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज, बुधवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी झालेल्या सुनावणीत मलिकांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा धक्का बसला असून त्यांना दिलासा मिळाला नसल्याचे दिसतेय. नवाब मलिक यांचा जामीन अर्ज पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे मलिकांचा तरूंगातील मुक्काम पुन्हा एकदा वाढला आहे. यानंतर मलिकांकडून आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात येण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – १ डिसेंबरपासून तुमच्याकडे Digital Currency येणार! कसा करता येणार वापर?)
Money laundering case | PMLA Court rejects the bail application of NCP leader and Maharashtra's former minister Nawab Malik.
(File photo) pic.twitter.com/2rLXHg3wgI
— ANI (@ANI) November 30, 2022
काय आहे प्रकरण
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या बेकायदेशीर कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयात आज, बुधवारी सुनावणी झाली. न्यायाधीश आर.एन रोकडे यांनी १४ नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता, या अर्जावरच आज सुनावणी झाली.
नवाब मलिकांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. मुंबईतील कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिकांवर आरोप आहेत. यापूर्वी त्यांच्या जामीन अर्जावर २४ नोव्हेंबर रोजी निकाल येणं अपेक्षित होता, परंतु निकालाचे कामकाज पूर्ण न झाल्याने आज, बुधवारी निकाल देण्यात आला. यापूर्वीही मलिकांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या मलिकांवर प्रकृती अस्वस्थामुळे कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मलिक यांनी जुलैमध्ये विशेष न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. गेल्या काही दिवसांपासून गोवावाला कंपाऊंड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे मलिक यांची जामिनासाठी धावाधाव सुरू आहे. अशातच मलिकांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने मलिकांचा जामीन नाकारल्याने मलिकांचा तुरूंगातील मुक्काम आता कायम राहणार आहे.
Join Our WhatsApp Community