काहीतरी नवीन असावे म्हणून नवनव्या संकल्पना सुचवायच्या आणि पूर्ण करायच्या त्या कोल्हापूरकरांनीच. चांदीचे चप्पल, चांदीचा मास्क आणि त्यानंतर आता एका सराफ व्यावसायिकाने चांदीची निमंत्रण पत्रिका तयार केली आहे. एक चांदीची घसघसशीत पत्रिका तयार करायची आणि ती सगळ्यांना व्हाॅट्सअॅपवर पाठवायची. समारंभ पार पडला की फ्रेम करुन आठवण जपायची, आहे की नाही मस्त कल्पना.
सध्या घरोघरी जाऊन पत्रिका वाटण्याचे प्रमाण कमी झाले आहे. डिजिटल पत्रिका व्हाॅट्सअॅपवर पाठवायची आणि फोनवर आग्रहाने बोलवायचे, अशी आता पद्धत आहे.
( हेही वाचा: Girl Fight Viral Video: एका बॉयफ्रेंडसाठी भिडल्या चक्क पाच तरुणी )
80 ग्रॅम चांदीचा वापर
पत्रिका डिजिटल पाठवायची असेल किंवा वधू- वराच्या कुटुंबीयांना द्यायची असेल तर मग ती चांदीची का नको? असा विचार करुन ही पत्रिका बनवली आहे. त्यासाठी 80 ग्रॅम चांदी वापरली असून पत्रिकेचा आकार दहा बाय सात इतका आहे. यासाठी पाच हजारांपर्यंत खर्च येतो.
Join Our WhatsApp Community