गोरेगाव येथील फिल्मिसिटीलगत असलेल्या जंगलात मंगळवारी पहाटे मोठा वणवा पेटला होता. गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटी मार्गावरील जंगलात लागलेल्या वणव्याचे छायाचित्र बुधवारी सकाळी समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागली. ऐन थंडीच्या मोसमात वणवा पेटल्याने हा वणवा मानवनिर्मित असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला.
हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत मोडत नाही. त्यामुळे जंगलाचे नुकसान झाले नाही, अशी माहिती वनाधिका-यांनी दिली. गोरेगाव येथील फिल्मिसिटीमार्गावरील रहेजा भागांजवळील वणवा लागला होता. आयटी पार्कभागाच्या मागे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या जंगलात हा वणवा पेटल्याचे इमारतीमधील रहिवाशांनी काढलेल्या छायाचित्रातून स्पष्ट दिसत होते. खासगी वनक्षेत्रात वणवा पेटला होता. अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी हा वणवा विझवला. ही आग उद्यानातील वनक्षेत्रात येऊ नये म्हणून आम्ही घटनास्थळी दाखल झालो होतो. वणवा खासगी क्षेत्रातच विझल्याने जंगलाचे नुकसान झाले नाही, अशी माहिती वनाधिका-यांनी दिली. खासगी क्षेत्रातील जंगलात नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात वणवा पेटणे हे संशयास्पद आहे. मुंबईत तापमान कमी झालेले असताना जंगलक्षेत्रात वणवा लागतो कसा, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला.
( हेही वाचा: RBI ने ‘या’ बँकेवर केली मोठी कारवाई; तुमचं खात तर नाही ना? )