श्रद्धा हत्याकांड : झोमॅटो डिलिव्हरीच्या तारखांमुळे मोठा ट्विस्ट, आफताबचा खोटारडेपणा उघड

199

दिल्लीत प्रेयसीची हत्या करून तिचे ३५ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आल्यावर संपूर्ण देश हादरला. या घटनेतील आरोपी आफताब पूनावाला याती पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये श्रद्धाच्या हत्येचा कट पूर्वनियोजित असून त्यासाठी तिला दिल्लीला घेऊन गेल्याचे आरोपी आफताबने कबूल केले आहे. या प्रकरणात झोमॅटो डिलिव्हरीच्या तारखांमुळे नवा ट्विस्ट आला आहे.

( हेही वाचा : बेस्टमुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान; काय आहे कारण?) 

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झोमॅटो फूड डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे आफताबच्या फोनवरून फूड ऑर्डर केल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या तारखांनुसार १८ मे पूर्वी आफताब दोन लोकांसाठी जेवण ऑर्डर करत होता, तर त्यानंतर आफताब फक्त एका व्यक्तीसाठी जेवण ऑर्डर करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब विविध अ‍ॅप्सवरून जेवण मागवत होता. मे महिन्याच्या अखेरिस त्याने ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्याचे प्रमाण कमी केले होते.

हत्येच्या एक तासानंतर जेवण मागवले

आफताब पूनावालाने १८ मे रोजी रात्री ९ वाजता श्रद्धाची हत्या केली परंतु फोन रेकॉर्डवरून स्पष्ट होते की, १८ मे रोजी त्याने रात्री १० वाजता जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यामुळे हत्येच्या तारखांबद्दल आफताब खोटे बोलत असल्याचा पोलिसांना संशय आहे किंवा हत्या नियोजित पद्धतीने घडवून तो अतिशय सामान्यपणे वागू लागला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.