Whatsapp वरील ‘हे’ पाच सेफ्टी फिचर्स माहिती आहेत का?

148

WhatsApp हे एक अतिशय लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. व्हाॅट्सअॅप आपल्या मेसेजिंग सुविधेसह वापरकर्त्यांच्या गोपयीनतेचीदेखील काळजी घेते. व्हाॅट्सअॅपने युजर्ससाठी अनेक प्रायव्हसी फीचर्स आणले आहेत. त्यांच्या मदतीने युजर्स चिंता न करता त्यांच्या मित्र आणि कुटुंबाशी बिनधास्त संवाद साधू शकतात.

हे आहेत पाच सेफ्टी फिचर्स

  •  तुमचा नंबर ज्यांच्याकडे आहे तेच तुम्हाला व्हाॅट्सअॅपवर ग्रुपमध्ये अॅड करु शकतात. आता व्हाॅट्सअॅप ग्रुप प्रायव्हसी सेटिंग्ज आणि ग्रुप इनव्हाईट सिस्टीमच्या मदतीने यूजर्स हे ठरवू शकतील की ग्रुपमध्ये कोणाला अॅड करायचे आहे. यासाठी तुम्हाला तीन पर्याय मिळतील. पहिला म्हणजे कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करु शकते. दुसरा म्हणजे काॅन्टॅक्टमध्ये असेलेले युजर्स आणि तिसरे म्हणजे तुम्ही ज्यांची निवड केली असे युजर्स करु शकतात.

New Project 2022 11 30T182136.110

  • व्हाॅट्सअॅपने एकाचवेळी अनेकांना संदेश फाॅरवर्ड करण्याच्या सेवेवर मर्यादा आणल्या आहेत. व्हाॅट्सअॅपने नवीन ग्रुप फाॅर्वर्डिंग लिमिट फीचर आणले आहे. ज्यामध्ये मेसेजला फाॅर्वर्डेड लेबल्स असे नाव दिले जाईल. त्याच्या मदतीने वापरकर्ते पाच ऐवजी एकदाच ग्रुपमध्ये मेसेज फाॅरवर्ड करु शकतील. जर तुम्हाला त्या मेसेजचा स्त्रोत माहित नसेल तर फाॅरवर्ड करु नये.

New Project 2022 11 30T182057.534

  • ज्या युजर्संना निरर्थक संदेश आवडत नाहीत किंवा वैयक्तिकरित्या आणि गटांमध्ये चुकीचे संदेश येत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे ती खाती ब्लाॅक करुन तक्रार करण्याचा पर्याय आहे.

New Project 2022 11 30T181958.718

  • देशात, व्हाॅट्सअॅपवर अशा 10 तथ्य तपासणी संस्था आहेत. या संस्था चुकीची माहिती पसरवणा-यांना ओळखण्यात त्यांचे पुनरावलोकन आणि पडताळणी करण्यात मदत करतात.

New Project 2022 11 30T181924.718

  • कोणत्याही पार्टीसिपेंट गटाला संदेश पाठवू शकतो आणि त्याची माहिती, विषय, चिन्ह आणि वर्णन बदलू शकतो. गटांमध्ये कोण संदेश पाठवू शकतो यावर प्रशासकाचे नियंत्रण असते.

New Project 2022 11 30T181828.662

  • जेव्हा तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये असता, तो ग्रुप सोडायच्यावेळी तुम्ही शांतपणे बाहेर पडू शकता. हे ग्रुप अॅडमिन वगळता इतर कोणत्याही सहभागीला कळत नाही.

New Project 2022 11 30T181739.830

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.