फेक कॉल्स आणि SMS पासून होणार सुटका; काय आहे TRAI ची नवी पॉलिसी?

147

स्मार्टफोन युजर्ससाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कारण या युजर्सची आता बनावट कॉल आणि मेसेजपासून सुटका होणार आहे. यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) एका नवीन तंत्रज्ञानावर काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी इतर नियामकांसह संयुक्त कृती योजनेसह बनावट कॉल आणि मेसेज शोधण्यासाठी विविध तंत्रज्ञानावर ट्राय काम करत असून सरकारही स्मॅप कॉल्स रोखण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर काम करण्याची तयारी करत आहे.

(हेही वाचा – Ration Card Update: रेशन कार्डधारकांसाठी सरकारची नवी मोठी घोषणा! डिसेंबरपासून मिळणार…)

काय म्हटले ट्रायने…

अनसोलिसीडेट कमर्शिअल कम्युनिकेशन किंवा फेक कम्युनिकेशन हे लोकांच्या गैरसोयीचे प्रमुख स्त्रोत आहे आणि व्यक्तीच्या गोपनीयतेवर अतिक्रमण करते, असे ट्रायने म्हटले आहे.

कंटाळवाणे, त्रासदायक कॉल्स आणि मेसेजच्या धोक्याला आळा घालण्यासाठी ट्रायने टेलिकॉम कमर्शिअल कम्युनिकेशन्स कस्टमस प्रेफरन्स रेग्युलेशन २०१८ देखील जारी केले आहे, ज्याने ब्लॉकचेनवर (DLT) आधारित एक इकोसिस्टम तयार केली आहे. हे नियमन सर्व व्यावसायिक प्रवर्तक आणि टेली मार्केटर्सना DLT प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे आणि त्यांच्या पसंतीच्या वेळी आणि दिवशी विविध प्रकारचे प्रचारात्मक संदेश प्राप्त करण्यासाठी ग्राहकांची संमती घेणे अनिवार्य करते. म्हणजेच मेसेजिंगसाठी ग्राहकांची मंजुरी घेणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे युजर्सल हव्या त्या दिवशी आणि त्या वेळेवरच मेसेज पाठवता येतात. यासह मेसेज पाठवण्याचे स्वरूपही निश्चित करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.