उद्धव ठाकरेंच्या मनात संजय राऊतांबद्दल धडकी! ठाकरे गटात राऊत एकाकी?

154

संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर देखील आक्रमक दिसत आहेत. संजय राऊत म्हणजे ठाकरे गटाचा बुलंद आवाज. जगात काही लोक असे असतात जे सतत चर्चेत असतात. त्यांनी काही म्हटलं तरी चर्चा होते. काही लोक तर मुद्दामून चर्चेत राहण्यासाठी बोलत असतात. संजय राऊत हे त्यापैकी एक आहेत. आधी राज ठाकरे यांच्या वक्तव्याची खूप चर्चा व्हायची. मीडियाला खेचण्याची ताकद राज ठाकरेंकडे होती. परंतु नंतर संजय राऊत या बाबतीत माहिर झाले.

( हेही वाचा : स्टेट बँकेचा ‘तालिबानी’ निर्णय, विरोधानंतर माघार)

संजय राऊतांनी ठाकरे गटाची बाजू नेहमीच उत्तमरित्या मांडली. ठाकरे गटाची ती तोफ जणू. मात्र आता हीच तोफ ठाकरे यांना आता नकोशी झाली आहे. संजय राऊत त्यांना नकोत असा विषय नसून त्यांना संजय राऊतांची पब्लिसिटी खटकतेय. राऊत सर्व लक्ष स्वतःकडे वळवून घेतात आणि पक्षाच्या मालकांकडे कुणी लक्ष देत नाही, हे आता उद्धव ठाकरे यांना कळून चुकले आहे. त्यामुळे राऊत तुरुंगातून बाहेर आल्यापासून त्यांना बोलायची किंवा झळकायची संधी मिळत नाही. संजय राऊत अंगार है, बाकी सब भंगार है अशी घोषणा मागे शिवसैनिकांनी दिली होती. या बाकी सब मध्ये केवळ विरोधक येत नसून स्वपक्षातील नेते सुद्धा येतात, ही भिती ठाकरेंना आता सतावू लागली आहे.

संजय राऊत मीडियात झळकतात म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांना पाठवलं. सावरकरांवर टीका करुन राहुल गांधींनी सगळं लक्ष स्वतःकडे केंद्रित केलं, त्याचप्रमाणे जर संजय राऊत या यात्रेत सामील झाले असते तर आदित्य ठाकरेंना पब्लिसिटी मिळाली नसतीच उलट राहुल गांधींचं श्रेय देखील संजय राऊतांनी घेतलं असतं. म्हणून ठाकरेगटाची ही मुलुखमैदानी तोफ बंद पाडण्यात आली. उद्धव ठाकरे यांना आपल्या मुलाला आदित्य ठाकरेंना प्रमोट करायचे आहे. जे श्रेय घेणार नाहीत असेच नेते त्यांच्या आसपास सोडले आहेत.

बिहारमध्ये जाताना देखील संजय राऊतांना मुंबईतच ठेवण्यात आलं. खरं पाहता बिहारमध्ये संजय राऊतांनी एक माहोल निर्माण केला असता. परंतु हेच ठाकरेंना नको. संजय राऊत यांनी ठाकरेंसाठी बलिदान दिले आहे, ते तुरुंगात राहुन आले आहेत. आता त्यांना जन्मठेप भोगण्याची घाई लागली आहे. इतका त्याग ते ठाकरे कुटुंबासाठी करायला तयार आहेत. पण उद्धव ठाकरे यांच्या मनात सर्व नेते व कार्यकर्त्यांविषयी नोकराची भावना आहे हे एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवर केलेल्या वक्तव्यावरुन लक्षात येते. त्यामुळे संजय राऊत यांनी आपल्या पुढे जाऊ नये अशी ठाकरेंची इच्छा आहे. आता राऊत फारसे मीडियात झळकणार नाहीत किंवा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणार नाहीत अशी काळजी ठाकरेंकडून घेतली जाईल.

आदित्य ठाकरे यांना हिरो करायचे असेल तर संजय राऊत यांची प्रसिद्धी रोखली पाहिजे असा विचार त्यांनी केला असावा. म्हणूनच उद्धव ठाकरेंच्या मनात संजय राऊतांबद्दल धडकी भरली आहे. पुढे कदाचित राऊत ठाकरे गटात एकाकी पडण्याची शक्यता आहे. खरे पाहता, त्यांची भूमिका आता संपली आहे. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाले आहेत. यापुढे ते मुख्यमंत्री बनतील अशी शक्यताही वाटत नाही. मग संजय राऊत बोलून करणार तरी काय?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.