भारत-अमेरिका यांच्यातील लष्करी सरावाने चीनचे धाबे दणाणले 

139

भारत आणि अमेरिका यांच्यात संयुक्त युद्धसराव झाल्यामुळे चीनचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. हा युद्धाभ्यास सध्या उत्तराखंडमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 100 किमी अंतरावर सुरू आहे. शांतता राखणे आणि आपत्ती निवारण कार्यात दोन्ही सैन्यांमध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवणे आणि कौशल्य सामायिक करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. दोन आठवडे हा सराव चालणार आहे.

चीनचा काय आहे आक्षेप? 

या युद्धसरावावर चीनने आक्षेप घेतला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव 1993 आणि 1996 मध्ये चीन आणि भारत यांच्यात झालेल्या करारांचे उल्लंघन करतो, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 1993 आणि 1996 च्या कराराचा चिनी परराष्ट्र मंत्रालयाचा संदर्भ मनोरंजक आहे कारण भारताने मे 2020 मध्ये पूर्व लडाखमधील एलएसीवरील विवादित भागात मोठ्या संख्येने सैन्य पाठवण्याच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) प्रयत्नांना द्विपक्षीय करारांचे उल्लंघन म्हटले आहे. शांतता राखणे आणि आपत्ती निवारण कार्यात दोन्ही सैन्यांमध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवणे आणि कौशल्य सामायिक करणे हा संयुक्त सरावाचा उद्देश आहे. लष्कराने 19 नोव्हेंबर रोजी ट्विट करुन माहिती दिली आहे.

(हेही वाचा IFFY 2022 : नदव लॅपिड यांना उपरती; म्हणाले, ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा उत्कृष्ट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.