हात धरुन किस करण्याचा प्रयत्न! मुंबईत कोरियन महिलेचा विनयभंग, पहा व्हिडिओ

167

अतिथी देवो भव, या भारतीय संस्कृतीला छेद देणारी घटना मुंबईमध्ये घडली आहे. मुंबईत एका दक्षिण कोरियन युट्यूबर तरुणीची छेडछाड करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर येत आहे. दोन तरुणांनी या तरुणीचा हात धरुन तिला आपल्या गाडीवर बसण्यास सांगत तिची छेड काढली असून, या घटनेचा सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.

कोरियन तरुणीचा विनयभंग

बुधवारी दक्षिण कोरियन युट्यूबर महिला ही संध्याकाळी 8च्या सुमारास मुंबईतील खार परिसरात होती. ही महिला लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना दोन तरुणांनी तिची छेड काढली. या दोघांपैकी एक जण या तरुणीच्या खूप जवळ आला आणि त्याने तरुणीला आपल्या स्कूटरवर बसण्यास सांगितले. या तरुणीने त्याला विरोध करताच या तरुणाने महिलेचा हात धरत तिला खेचले. इतकेच नाही तर तिच्या खांद्यावर हात ठेऊन त्याने तिला किस करण्याचा देखील प्रयत्न केला. त्यानंतर ही तरुणी त्याला नकार देत त्याच्यापासून लांब गेली.

पण तरीही हे तरुण थांबले नाहीत. ही तरुणी पुढे जात असताना तरुणांनी तिचा पाठलाग केला आणि आमच्यासोबत चल, आम्ही तुला सोडतो असे सांगितले. पण आपले घर इथेच असल्याचे तरुणीने सांगितल्यावरही तरुणांनी तिचा पिच्छा सोडला नाही. हा प्रकार कोरियन तरुणीच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये कैद झाला असून, या कृत्याबाबत खेद व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचाः सोने खरेदी करणा-यांसाठी धोक्याची घंटा, केंद्र सरकार लावू शकते ‘हा’ कर)

पोलिसांनी सुरू केला तपास

या प्रकरणाबाबत कोणतीही पोलिस तक्रार झालेली नाही. पण या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. संबंधित तरुणांची ओळख पटवण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.