शिवसेनेच्या फुटीनंतर आता शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोघांनीही आता पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान शिंदे गटावर जोरदार टीका करणा-या उद्धव ठाकरे यांनी बुधवारी एका कार्यक्रमात मोठे विधान केले आहे.
आपण राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलून दाखवले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
(हेही वाचाः वेदांता-फॉक्सकॉन सारखे प्रकल्प राज्याबाहेर का गेले? कारणं शोधण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय)
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
तुम्ही म्हणालात की तुम्हाला मला पुन्हा मुख्यमंत्री बनवायचे आहे. पण मला मुख्यमंत्री करायची गरज नाही. माझ्या हक्काचा शिवशक्ती-भीमशक्तीची एक कर्तबगार व्यक्ती मग ती महिला असेल किंवा पुरुष त्यांना आपल्याला मुख्यमंत्री करायचे आहे. हे स्वप्न जर का सत्यात उतरवायचं असेल तर तुम्हाला आमच्या सोबत येऊन वाड्या-वस्त्यांमध्ये विचारांची मशाल घेऊन फिरावं लागेल, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या विधानामागचा उद्धव ठाकरे यांचा मूळ हेतू काय, याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community