MSRTC: ‘एसटी’ने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता रेल्वेप्रमाणे कळणार ‘लालपरी’चं Live लोकेशन!

188

तुम्ही एसट बस अर्थात लालपरीचे चाहते आहात.. किंवा तुम्ही सातत्याने एसटी बसने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रेल्वेप्रमाणे एसटी बसचे लाईव्ह लोकेशन तुम्हाला जाणून घेता येणार आहे. एसटी महामंडळाकडून (MSRTC) एक मोबाईल अॅप्लिकेशन बनवण्यात आले आहे. या अॅपद्वारे एसटीच्या प्रवाशांना एसटी बस कुठे आहे याचा ठावठिकाणा समजणार आहे.

(हेही वाचा – Ration Card Update: रेशन कार्डधारकांसाठी सरकारची नवी मोठी घोषणा! डिसेंबरपासून मिळणार…)

भारतीय रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे कुठे आहे, हे जाणून घेण्यासाठी एक अॅप्लिकेशन तयार केलेले आहे. त्याचप्रमाणे एसटी कुठे पोहोचली हे प्रवाशांना जाणून घेण्यासाठी एक अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अॅप्लिकेशनचे नाव व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम म्हणजेच व्हीटीएस (VTS) असे आहे. या अॅपद्वारे एसटी बस डेपोत किती वाजता पोहोचणार, अपघात झाल्यास काय करायचे, एसटी बिघडल्यास त्याची माहिती या अ‍ॅपमधून प्रवाशांना मिळणार आहे. इतकेच नाही तर एसटी बिघडली किंवा अपघात झाल्यास या अ‍ॅपमधून यंत्रणांना फोन करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. प्रवाशांना दोन भाषेत हे अॅप वापरता येणार आहे.

सध्या राज्यातील 13 स्थानकांवर व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (VTS) ही प्रणाली प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर या अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या राज्यातील काही स्थानकांवर LED स्क्रीनच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर प्रवाशांना अॅपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा देण्याच्या हेतूने एसटी महामंडळाने व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (VTS) सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या प्रणाली अंतर्गत पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे बस स्थानकासह राज्यातील १३ बस स्थानकांवर याची सेवा मिळत आहे. एसटी प्रशासन पुढील दोन महिन्यांमध्ये लालपरीची माहिती देणारे मोबाईल अ‍ॅप सुरु करणार असून टप्प्याटप्याने राज्यभर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडाळाकडून देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.