13 वर्षांपूर्वी गोव्यात कॅसिनो माफिया आले होते. आता या माफियांनी संपूर्ण राज्यालाच जुगाराच अड्डा बनवले आहे. पणजीची शान असलेल्या मांडवी नदीवर कॅसिनो माफियांनी अक्षरश: उच्छाद मांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील जनजीवनही पुरते बिघडून गेले आहे. या माफियांवर सरकारी यंत्रणांकडून कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.
ब्रिटिशांनी व्यापाराच्या बहाण्याने चोरपावलांनी भारतात प्रवेश केला आणि नंतर संपूर्ण देशच गिळंकृत केला होता. त्याचाच कित्ता कॅसिनो माफियांनी गोव्यात गिरवला आहे.
कॅसिनो जाना हे क्या?
अंधार पडू लागताच ही रोषणाई भुरळ घालू लागते. कॅसिनो माफियांचे एजंट तुमच्यापर्यंत पोहोचू लागतात. त्यांचे नेटवर्क गोव्याचे विमानतळ, बस- स्थानकापासून रस्त्या-रस्त्यात दिसून येते. रस्त्यावरच जागोजागी एजंट लोकांना कॅसिनो जाना है क्या, अशी विचारणा करतात. त्याच्या हातात जुगार खेळण्याचे मोफत कूपन ठेवतात. एन्ट्री फीमध्येच अनलिमिटेड दारु, जेवण आणि डान्सची मजा घेता येईल, असे पटवून दिले जाते व खेळ सुरु होतात.
( हेही वाचा: अल्पसंख्याकांसाठी भारत ‘जगात भारी’, जागतिक अहवालात झाले कौतुक )
नदी पात्रात झगमगाट
खानपान आणि मनोरंजनाच्या नावाखाली 13 वर्षांपूर्वी कॅसिनो गोव्यात आला. नंतर ते हळू हळू वाढू लागले. आज गोवा- पणजीत 26 ते 6 कॅसिनो पणजीच्या मांडवी नदीपात्रात आहेत. डेल्टिन जॅक, बिग डॅडी, मजेस्टिक प्राईड, कॅसिनो प्राइड अशा नावांनी 6 जहाजांमध्ये कॅसिनो थाटले आहेत.
Join Our WhatsApp Community