वायूदलाच्या ‘चेतक’चं बारामतीत इमर्जन्सी लँडिंग, काय आहे कारण?

166

तांत्रिक बिघाडामुळे भारतीय हवाई दलाच्या चेतक हेलिकॉप्टरने आज, गुरूवारी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळावर सावधगिरीने लँडिंग करण्यात आल्याचे समोर आले आहे.  बारामती तालुक्यातील खंडज- निरावागज रोडच्या उजव्या बाजूस हनुमंत ज्ञानदेव आटोळे यांच्या शेतात आज सकाळी दहा वाजता अचानकपणे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग झाले.

(हेही वाचा – आता ७/१२ उताऱ्यावर ‘QR’ कोड; आधारच्या धर्तीवर मिळणार ‘युनिक’ क्रमांक)

तांत्रिक बिघाड झाल्याने इंडियन एअर फोर्सचे चेतक हेलिकॉप्टर महिला पायलट गायत्री यांना इमर्जन्सी लँडिंग करणे गरजेचे वाटले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट सह चार व्यक्तींचा समावेश होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचार यांनी दिली. दरम्यान, बारामती खंडज गावामध्ये अचानकपणे हेलिकॉप्टरचे लँडिंग झाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या पार्श्वभूमीवर माळेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन या हेलिकॉप्टर, पायलेट व त्यांच्या इतर साथीदारांना सुरक्षितता पुरवली.

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन स्थितीची पाहणी केली. दरम्यानच्या कालावधीत इंडियन एअर फोर्सचे दुसरे हेलिकॉप्टर मदतीसाठी घटनास्थळी आले असून युद्ध पातळीवर नादुरुस्त हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.