गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढउतार होत आहेत. सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ८० डॉलरच्या खाली आले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.
( हेही वाचा : Shraddha Murder Case : श्रद्धाची हाडे, कपडे कुठे फेकले? आफताबने नार्को टेस्टमध्ये दिले उत्तर…)
सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या दरांनुसार नोएडा-ग्रेटर नोएडा येथे पेट्रोल ६ पैशांनी तर डिझेल ३ पैशांनी स्वस्त झाले आहे. याशिवाय गाझियाबादमध्ये पेट्रोलचे दर १८ पैशांनी घसरले आहेत. जागतिक बाजारात गेल्या २४ तासांमध्ये कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल सुमारे ३ डॉलरने घसरले आहेत. याचा परिणाम गुरूवारी सकाळी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींवर झाला.
चार महानगरांमधील पेट्रोलचे दर
- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
- कोलकात्यामध्ये पेट्रोल ९०.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर