‘काँग्रेसने जेव्हा मोदींचा अपमान केला तेव्हा…’, खर्गेंच्या मोदींवरील टीकेला अमित शहांचे प्रत्युत्तर

119

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. पण या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका कोली होती. नरेंद्र मोदी हे 100 डोकी असलेल्या रावणासारखे आहेत, असे विधान खर्गे यांनी मोदींबाबत बोलताना केले होते. त्यावरुनच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खर्गे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

जनता उत्तर देईल

गुजरातमधील एका सभेत अमित शहा यांनी खर्गेंचा समाचार घेतला आहे. गुजरातमध्ये जितक्या वेळा काँग्रेसने पंतप्रधानांविरुद्ध अपशब्द वापरले आहेत किंवा चुकीचा प्रचार केला आहे त्या प्रत्येक वेळी जनतेने मतपेटीतून काँग्रेसला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यावेळी देखील मोदींच्या अपमानाला गुजरातची जनता उत्तर देईल, असे अहमदाबादमधील एका रोड शोमध्ये गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः ‘महाराजांचा अपमान करण्यासाठी सरकारमध्ये स्पर्धा लागली आहे’, राऊतांचा घणाघात)

मोदींचा काँग्रेसवर निशाणा

नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसवर निशाणा साधत प्रत्युत्तर दिले आहे. मोदींचा सर्वात जास्त अपमान कोण करतो, याबाबत काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू आहे. पण एक गोष्ट लिहून ठेवा, जितका चिखल टाकाल, तितकी कमळं फुलतील, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.