भाजपाने फुंकले लोकसभेचे रणशिंग; केंद्रीय मंत्र्यांसह ‘लोकसभा मतदारसंघ प्रवास’ योजना

150

राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना भाजपाने लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपातर्फे लोकसभा प्रवास योजना आखण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी त्याची घोषणा केली.

स्वतंत्र योजना लवकरच सुरू होणार

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बावनकुळे यांनी सांगितले की, केंद्रीय कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा प्रवास योजना राज्यात आजपासून सुरू झाली आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री प्रवास करत आहेत. त्याच पद्धतीने राज्यातील अन्य १७ लोकसभा मतदारसंघात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक बळकट करण्याचे काम होईल. राज्याच्या लोकसभा प्रवास योजनेचे मुख्य संयोजक किशोर काळकर आहेत, केंद्रीय लोकसभा प्रवास योजनेचे प्रभारी माजी मंत्री बाळा भेगडे आहेत. राज्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बळकटीसाठी एक स्वतंत्र योजना लवकरच सुरू होणार आहे. त्याची जबाबदारी आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावर देण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

(हेही वाचा ‘रावण’ म्हणून टीका करणा-या खरगेंना पंतप्रधान मोदींनी दिले उत्तर, म्हणाले…)

कोणाकडे कुठली जबाबदारी?

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी असतील.
  • केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघांची जबाबदारी असेल.
  • नारायण राणे (सांगली), रावसाहेब दानवे (लातूर व मावळ), डॉ. भागवत कराड (परभणी व धुळे), डॉ. भारती पवार (नाशिक) आणि कपिल पाटील (रावेर आणि सोलापूर) अशी जबाबदारी असेल.
  • हे केंद्रीय मंत्री महिन्यातून एकदा संबंधित लोकसभा मतदारसंघात एक दिवसाचा प्रवास करतील व त्यामध्ये संघटनात्मक आणि सार्वजनिक स्वरुपाचे कार्यक्रम असतील.
  • प्रदेश सरचिटणीसपदी विजय चौधरी
  • भाजपाचे नंदूरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे, अशी घोषणा बावनकुळे यांनी केली.
  • महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र कोणकोणत्या विभागात मागे पडला, यावर श्वेत पत्रिका काढावी.
  • प्रत्येक विभागाचा अहवाल मांडला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पळता भुई थोडी होईल, असे ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.