देशातील ‘या’ ६ विमानतळांच्या धावपट्ट्या आहेत सर्वात धोकादायक! छोट्याशा चुकीमुळे होऊ शकते मोठी दुर्घटना

167

भारतात ६ टेबलटॉपसह एकूण १२ विमानतळांच्या धावपट्ट्या धोकादायक आहेत. या विमानतळांवर वैमानिकांच्या छोट्याशा चुकीमुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. आपण देशातील अशाच धोकादायक विमानतळांविषयी माहिती घेऊया…

( हेही वाचा : डिसेंबरमध्ये कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा! )

लेह विमानतळ

कुशोल बकुला रिमपोची विमानतळ लेह येथे आहे. ही टेबलटॉप धावपट्टी आहे. या विमानतळावरील धावपट्टी तब्बल ३२५९ मीटर उंचीवर आहे. या विमानतळावर विमानांचे लँडिंग करणे हे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही. येथे धावपट्टी वगळता केवळ बर्फ आणि पर्वतच दिसतात.

New Project 12

लेंगपुई विमानतळ

लेंगपुई विमानतळ मिझोराम राज्यात आहे. हे विमानतळ दुसऱ्या महायुद्धापूर्वी मित्र राष्ट्रांच्या सैन्याने बांधले होते. पावसाळ्यात हे विमानतळ धोकादायक बनते. हे भारतातील तीन टेबलटॉप विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळाची धावपट्टी एका पठारावर बांधलेली आहे. धावपट्टीचा आकार 2500 मीटर उंचावर आहे. त्याच्या दोन्ही बाजूला दऱ्या आहेत.

कोझिकोड विमानतळ

कोझिकोड विमानतळ केरळमध्ये आहे. या विमानतळावर टेबल टॉप रनवे देखील आहे. या विमानतळावर मोठा विमान अपघात सुद्धा झाला आहे. याठिकाणी लँडिंगच्या वेळी एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले होते. यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले. हे विमान दुबईहून कालिकतला येत होते. या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला.

New Project 13

मंगलोर विमानतळ

मंगलोर विमानतळ हे टेबलटॉप विमानतळ आहे. मे 2010 मध्ये येथे मोठा अपघात झाला होता. या अपघातात एअर इंडियाचे विमान टेबल-टॉप रनवे ओव्हरशॉट झाले. डोंगरावरून खाली पडल्यानंतर विमानाला आग लागली. या अपघातात विमानातील 166 जणांपैकी केवळ 8 जण बचावले.

लक्षद्वीप विमानतळ

लक्षद्वीप विमानतळ म्हणजे भारतातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक असले तरी या विमानतळाचा समावेश धोकादायक विमानतळांमध्ये होतो. हे विमानतळ समुद्राच्या मधोमध बांधण्यात आले असून याची लांबी ४ हजार फूट आहे. धावपट्टी लहान असल्याने विमान उतरवणे आव्हानात्मक समजले जाते.

New Project 11

गग्गल विमानतळ

देशातील सर्वात धोकादायक विमानतळाच्या धावपट्टीमध्ये गग्गल विमानतळाच्या धावपट्टीचाही समावेश आहे. गग्गल विमानतळ कांगडा, हिमाचल प्रदेश येथे आहे. हे विमानतळ 1200 एकरवर बांधले आहे. त्याची धावपट्टी 2492 फूट उंचावर आहे. या धावपट्टीवर विमान उतरवताना झालेली लहानशी चूकसुद्धा मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.