६ डिसेंबरला दादरमध्ये मद्य विक्रीस बंदी

168

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर या दिवशी दादर परिसरातील सर्व किरकोळ मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचा आदेश मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी गुरुवारी, १ डिसेंबर रोजी जारी केले.

मुंबई शहर जिल्ह्यातील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ.जी.आय. विभाग, मुंबई शहर यांच्या कार्यक्षेत्रातील दादर, शिवाजी पार्क, माहिम, धारावी, सायन, करी रोड स्टेशनपर्यंतचा सर्व भाग, वरळी सी फेस, वरळी कोळीवाडा ते संगम नगर पर्यंत तसेच सायन कोळीवाडा, किंग्ज सर्कल, वडाळा, शिवडी, काळाचौकी, भोईवाडापर्यंत हद्दीमधील सर्व अनुज्ञप्त्या तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ई- विभाग, मुंबई शहर याच्या कार्यक्षेत्रातील फक्त वरळी भागातील सर्व मद्यविक्री दुकाने मंगळवार, ६ डिसेंबर रोजी पूर्णतः बंद ठेवण्यात यावीत, असे आदेशात म्हटले आहे.

(हेही वाचा ‘रावण’ म्हणून टीका करणा-या खरगेंना पंतप्रधान मोदींनी दिले उत्तर, म्हणाले…)

…तर कठोर कारवाई

या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करून मद्य विक्री करताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.