Whatsapp हे सर्वात लोकप्रिय अॅप आहे. स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तुम्हाला हे सोशल मीडिया अॅप पाहायला मिळेल. लोकप्रियता पाहता व्हाॅट्अॅपमध्ये नवनवे फीचर्स अपडेट होत आहेत. आता व्हाॅट्सअॅप यूजर्स प्लॅटफाॅर्मवर स्वत:ला मेसेज पाठवता येणार आहे.
कंपनीने सोमवारी Message Yourself नावाचे नवे फीचर सुरु केले आहे. हे फीचर अत्यावश्यक अपडेटसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, हे फीचर्स स्वत:ला महत्त्वाच्या नोट्स, रिमाइंडर्स आणि अपडेट पाठवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या फीचरद्वारे तुम्ही To-Do लिस्ट, शाॅपिंग लिस्ट, नोट्स इत्यादी सांभाळून ठेवू शकता. हे नवे फीचर अॅंड्राॅइड आणि आयफोनवर उपलब्ध असणार आहे.
( हेही वाचा: ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा; एक दिवसाची वाढीव मुदत )
नवे फीचर्स कसे वापराल?
- Whatsapp सर्वात आधी अपडेट करा आणि अॅप्लिकेशन ओपन करा.
- नव्या चॅटमध्ये जा आणि काॅन्टॅक्ट लिस्टच्या टाॅपवर क्लिक करा. तिथे तुमचा Contact नंबर दिसेल.
- नंबरवर क्लिक करुन तुम्ही स्वत:ला मेसेज पाठवू शकता.
WhatsApp चे नवे फिचर्स
मेटा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हाॅट्सअॅपसाठी नवे फीचर्स लाॅंच केले आहेत. यात 32 लोकांना एकत्र व्हिडीओ काॅलिंग, इन चॅट पोल आणि ग्रुप लिमिट 1024 व्यक्तींना समाविष्ट करता येणार आहे. यासोबतच Communities On Whatsapp नावाचे फीचर लाॅंच केले आहे.
व्हाॅट्सअॅप डेस्कस्टाॅप व्हर्जनसाठी काॅलिंग फीचरवर काम करत आहे. तर लॅपटाॅप सुरु असून फोनवर बोलण्याची गरज भासणार नाही. लॅपटाॅप किंवा डेस्कस्टाॅपवरुनही काॅल रिसिव्ह आणि बोलता येईल. हे फीचर्स सध्या बीटा आवृत्ती युजर्ससाठी उपलब्ध आहे. नाॅन-बीटा यूजर्ससाठी लवकरच लाॅंच केले जाईल.
Join Our WhatsApp Community