मध्य रेल्वेच्या तिजोरीत २८३ कोटींची भर; काय आहे कारण?

129

मध्य रेल्वेने सर्व स्थानके, विभाग, प्रतिष्ठाने, डेपो, कार्यशाळा, शेड, सर्व रेल्वे स्थाने/विभाग भंगारमुक्त करण्यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन” साध्य करण्यासाठी आपले अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

( हेही वाचा : डिसेंबरमध्ये कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा!)

मध्य रेल्वेने भंगारातून कमावले २८३. ६१ कोटी

मध्य रेल्वेत चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल ते नोव्हेंबर) दरम्यान, भंगाराच्या विक्रीतून २८३.६१ कोटी रुपयांची नोंद झाली जी नोव्हेंबर २०२२ पर्यंतच्या २१८.९२ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा २९.५४% जास्त आहे. आणि एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतील आतापर्यंतची सर्वाधिक भंगार विक्री आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील भंगार विक्री २८०.१८ कोटी होती.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूलच मिळत नाही, तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे. ते म्हणाले की, मध्य रेल्वे झिरो स्क्रॅप मिशन मोडमध्ये सर्व निवडल्या गेलेल्या भंगार साहित्याची रेल्वेमधील विविध ठिकाणी विक्री करेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.