चंद्रपूर, सिंधुदुर्गात सोन्याच्या खाणी असल्याचे उघड झाले आहे. राज्याच्या भूगर्भात कोळसा, बाॅक्साईट, लोह या खजिनासह सोनेही दडले असल्याची माहिती उघड झाली आहे. चंदूपर जिल्ह्यात मिंझरी आणि बामणी या भागात सोन्याचे दोन ब्लाॅक आढळले आहेत. तसेच या भागात तांबेही असून मोठ्या प्रमाणात सोने मिळू शकते, असा अहवाल केंद्राच्या खनिक्रम विभागाने दिला आहे. दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूगर्भात सोने असल्याची शक्यता आहे. त्यासाठी चाचणी सुरु झाली आहे.
सोन्याचे दोन ब्लाॅक असल्याची माहिती केंद्रीय अधिका-यांनी दिली
दरम्यान, चंद्रपूर येथील गोंडपिपरी तालुक्याच्या भूर्गभात मौल्यवान प्लॅटिनम, सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रुथेनियम, रेडिअम, इरेडिअम धातू असल्याचे 10 वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. आता सोने खाणीचे ब्लाॅक सापडल्याने याला अधिक दुजोरा मिळाला आहे. राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरु करुन सोने खोन व्यवसायातील अडचणी दूर करुन राज्याच्या महसूलात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात दिले होते. राज्यात सोन्याचे दोन ब्लाॅक असल्याची माहिती केंद्रीय अधिका-यांनी दिली आहे.
( हेही वाचा: प्रवीण दरेकर यांना मुंबै बॅंक घोटाळा प्रकरणात क्लीन चिट )