मालवाहतुकीद्वारे रेल्वे मालामाल; इतक्या कोटींची केली कमाई

169

2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीने गेल्या वर्षातील याच कालावधीमधील मालवाहतूक आणि उत्पन्नाला मागे टाकले आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये 978.72 मेट्रिक टनांची एकूण मालवाहतूक झाली, गेल्या वर्षी याच कालावधीत ही मालवाहतूक 903.16 मेट्रिक टन होती. त्यामुळे रेल्वेने यावर्षी 1,05,905 कोटी रुपयांचा महसूल मिळवला असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 91,127 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत या वर्षीच्या महसुलात 16% वाढ झाली आहे.

नोव्हेंबर 2022 मध्ये 123.9 मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात 116.9 मेट्रिक टन मालवाहतूक झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात मालवाहतुकीत 5% वाढ आहे. ऑक्टोबर महिन्यात 13,560 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मिळालेल्या 12,206 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात महसुलात 11% सुधारणा झाली आहे.

( हेही वाचा: आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ वितरणासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाला मुहूर्तच सापडेना! )

“हंग्री फॉर कार्गो” या मंत्राला अनुसरून भारतीय रेल्वेने आपल्या सेवांच्या पुरवठ्यामध्ये स्पर्धात्मक दरांवर सुधारणा करण्याबरोबरच व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे रेल्वेकडे नेहमीच्या आणि नेहमीपेक्षा वेगळ्या अशा दोन्ही मालवाहतुकीचा नवा ओघ वळला आहे. ग्राहककेंद्री दृष्टीकोन आणि तत्पर धोरणाचे पाठबळ असलेल्या व्यवसाय विकास युनिट्सच्या कामामुळे रेल्वेला ही उल्लेखनीय कामगिरी करणे शक्य झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.