इसरो हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीवेळी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची फसवणूक करणा-या चार आरोपींना जामीन मंजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा हाच निर्णय रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाला या याचिकांवर पुढील चार आठवड्यांत पुन्हा निर्णय देण्यास सांगितले आहे.
शास्त्रज्ञांविरुद्ध रचला कट
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुनावणी न्यायमुर्ती एमआर शहा आणि न्यायमुर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठासमोर पार पडली. इसरोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आणि त्यांना खोट्या खटल्यात अडकवल्याचा आरोप असलेल्या त्या सर्व अधिका-यांना जामीन देण्यास या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. याप्रकरणी केरळचे माजी डीजीपी सीबी मॅथ्यूज, गुजरातचे माजी एडीजीपी आरबी श्रीकुमार, माजी आयबी अधिकारी पीएस जयप्रकाश आणि दोन केरळ पोलीस अधिका-यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.
( हेही वाचा: मोठी बातमी! चंद्रपूरनंतर कोकणातील ‘या’ जिल्ह्यात सोन्याची खाण? )
उच्च न्यायालयाकडून निर्णय देताना काही चुका झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, त्या चुका सुधारण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी देण्यात येत असल्याचेही सांगितले. याप्रकरणी वैयक्तिक आरोपांची चौकशी झालेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणाची पुन्हा सुनावणी घेऊन योग्य तो निकाल द्यावा असेही सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाला सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community