जोगेश्वरीत मुंबईकर खवय्यांसाठी सलग तीन दिवस भव्य ‘मिसळ व बिर्याणी’ महोत्सवाची सुरूवात होणार आहे. गेल्यावर्षी सुद्धा या महोत्सवाला मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जोगेश्वरी (पूर्व), जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील शामनगर तलाव येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : आणखी एक आफताब! आधी प्रेयसीला गोळ्या घालून ठार केले नंतर जंगलात फेकले, नेमके काय आहे प्रकरण?)
मिसळ व बिर्याणी म्हटलं की तोंडाला पाणी सुटते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील मिसळ व बिर्याणीच्या चवीचा आस्वाद एकाच छत्राखाली घेता यावा यासाठी जोगेश्वरीत २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस ‘मिसळ व बिर्याणी महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील शामनगर तलाव येथे हा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘मिसळ व बिर्याणी’ हे दोन्ही खवय्यांचे आवडीचे पदार्थ. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील मिसळ व बिर्याणीची चवही वेगवेळी असते. गेली दोन वर्ष कोविडमुळे अनेक जत्रा, मेळावे, महोत्सवांवर बंधने घालण्यात आली होती. परंतु आता कोविडच्या काळातील निर्बंध उठविण्यात आल्याने मुंबईकरांची इच्छा पुर्ण करण्यासाठी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी २ ते ४ डिसेंबर या कालावधीत‘मिसळ व बिर्याणी महोत्सवा’चे आयोजन केले आहे.
इच्छापुर्ती गणेश मंदिर परिसर, शामनगर तलाव, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड परिसर या ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मुंबईकरांना महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यातील मिसळ व बिर्याणीचा आस्वाद घेता येणार आहे. महोत्सवात स्टॉल्स उभारण्यात येणार आहे. शुक्रवार २ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे. रविवारी ४ डिसेंबर रात्री १० वाजेपर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.
Join Our WhatsApp Community