सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसागणिक पेटत आहे. जेव्हा कर्नाटकातील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यातील गावे हे कर्नाटकात विलीन करण्यात करण्यात यावीत, अशी मागणी केली, तेव्हापासून हा वाद आणखी वाढला आहे. आता मुख्यमंत्री बोम्मई यांच्या आणखी एक विधानाने सीमावर्ती वाद चिघळला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री बोम्मई?
मुख्यमंत्री बोम्मई यांच्या पहिल्या विधानाने जो गोंधळ सुरु झाला आहे, तो शांत होत आता बोम्मई यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला भेट देऊ नये, असा इशाराच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. यावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक असा सीमावाद उफळला आहे. आपल्या राज्याच्या सीमेच्या पलीकडील जनताही आपलीच आहे. आपल्या राज्याच्या सीमेपलीकडील राज्यातील कन्नड शाळांचा विकास होत नाही. तेथील शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. आपल्या राज्याच्या सीमेच्या पलीकडील राज्यात असणाऱ्या कन्नड शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देणार आहे. कन्नड प्राधिकरणाच्या माध्यमातून शाळांना अनुदान देणार आहे. सोलापूर येथे कन्नड भवन उभारण्यासाठी दहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे, असेही मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.
Join Our WhatsApp Community